एसटीच्या ‘आवडेल तेथे प्रवास’ योजनेतील पास आता ऑनलाइन; आगारात जाण्याची गरज नाही
एसटीच्या ‘आवडेल तेथे प्रवास’ योजनेतील पास आता ऑनलाइन; आगारात जाण्याची गरज नाही
मुंबई :
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवाशांच्या सोयीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला असून, ‘आवडेल तेथे प्रवास’ योजनेतील ४ व ७ दिवसांचे पास आता ऑनलाइन उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना पास काढण्यासाठी आगारात जाऊन हस्तलिखित पद्धतीने अर्ज करण्याची आवश्यकता राहणार नाही.
एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने २९ सप्टेंबर २०२६ रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, या योजनेतील ४ आणि ७ दिवसांच्या पाससाठी ऑनलाइन कार्यप्रणाली सुरू करण्यात आली आहे. एसटी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळासह मोबाईल ॲप्लिकेशनवरून प्रवाशांना हा पास काढता येणार आहे.
ऑनलाइन पद्धतीने प्राप्त झालेला पास प्रवासी प्रिंट स्वरूपात किंवा मोबाईलमध्ये पीडीएफ स्वरूपात दाखवू शकतील. तसेच ऑनलाइन पासवर क्यूआर (QR) कोड देण्यात येणार असून, प्रवासादरम्यान हा कोड स्कॅन करून पासची पडताळणी केली जाणार आहे. त्यामुळे पास काढण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि डिजिटल होण्यास मदत होणार आहे.