ठाणे जिल्हा परिषदेत पेन्शनधारकांना महिन्याच्या पहिल्याच दिवशी पेन्शन

0
21
ठाणे जिल्हा परिषदेत पेन्शनधारकांना महिन्याच्या पहिल्याच दिवशी पेन्शन
ठाणे जिल्हा परिषदेत पेन्शनधारकांना महिन्याच्या पहिल्याच दिवशी पेन्शन

ठाणे जिल्हा परिषदेत पेन्शनधारकांना महिन्याच्या पहिल्याच दिवशी पेन्शन

ठाणे :
जिल्हा परिषद, ठाणे अंतर्गत पेन्शनधारक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महिन्याच्या पहिल्याच दिवशी पेन्शन त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली. राज्यात प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील २ हजार २५० पेन्शनधारकांना वेळेत पेन्शन अदा करण्यात आली.
पेन्शन वितरणाची कार्यवाही जिल्हा परिषद मुख्यालयासह विविध तालुक्यांमध्ये करण्यात आली. यामध्ये जिल्हा परिषद मुख्यालयातील ४२४, मुरबाडमधील ३४४, शहापूरमधील ४४९, भिवंडीतील २६१, कल्याणमधील ४८० आणि अंबरनाथमधील २९२ पेन्शनधारकांचा समावेश आहे.
महिन्याच्या सुरुवातीलाच पेन्शनची रक्कम खात्यावर जमा झाल्यामुळे पेन्शनधारकांना आर्थिक नियोजन करणे अधिक सुलभ होणार आहे. वेळेत आणि सुलभ प्रशासकीय सेवा देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम राबविण्यात आला.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे यांच्या विशेष प्रयत्नातून ही कार्यवाही पूर्ण करण्यात आली.
वित्त व सामान्य प्रशासन विभाग तसेच तालुकास्तरीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून निर्धारित वेळेत पेन्शन वितरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या प्रक्रियेत डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर, वेळबद्ध सेवा आणि प्रशासकीय समन्वयावर भर देण्यात आला.
जिल्हा परिषद ठाणेच्या या उपक्रमामुळे पेन्शनधारकांना महिन्याच्या पहिल्याच दिवशी आर्थिक उपलब्धता मिळण्यास मदत झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here