रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन

0
20

रत्नागिरी :
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
रत्नागिरीचे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी रत्नागिरी जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहायक संदीप सावंत यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
महात्मा गांधी यांच्या सत्य, अहिंसा आणि स्वातंत्र्याच्या विचारांचे, तसेच लालबहादूर शास्त्री यांच्या साधेपणा, कर्तव्यनिष्ठा आणि राष्ट्रसेवेच्या कार्याचे स्मरण यावेळी करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here