एमएमआरडीए अर्थसंकल्पातून ठाणे-कल्याणचा कायापालट – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई l प्रतिनिधी
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या ४८ हजार कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून ठाणे आणि कल्याण या शहरांचा सर्वांगीण कायापालट होणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ठाण्याला गतिशील प्रवास केंद्र म्हणून विकसित करण्यात येणार असून कल्याण हे भविष्यातील प्रगत शहरी केंद्र म्हणून उदयास येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
ठाण्यासाठी १२ ते १३ हजार कोटी रुपयांची मोठी तरतूद करण्यात आली आहे. सुमारे १२ किलोमीटर लांबीच्या ठाणे-बोरीवली दुहेरी बोगदा प्रकल्पा साठी २०२६-२७ या वर्षाकरिता ३ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून या प्रकल्पास एकूण १८ हजार ८३८ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
ठाण्यात मेट्रो मार्गांचे जाळेही विकसित करण्यात येत आहे. कासारवडवली ते वडाळा मेट्रो क्रमांक ४, मेट्रो ४-अ (गायमुखपर्यंत विस्तार) तसेच स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी मेट्रो क्रमांक ६ या प्रकल्पांमुळे ठाणे-मुंबई संपर्क अधिक सक्षम होणार आहे. ठाणे सागरी मार्गाच्या पहिल्या टप्प्यासाठी १ हजार २५ कोटी रुपये आणि आनंदनगर-साकेत उन्नत मार्गासाठी ८८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. रायलादेवी व मासुंदा तलाव सुशोभीकरण तसेच कोलशेत-काल्हेर खाडी पुलासाठी २१४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
दरम्यान, भविष्यातील नियोजित शहरी केंद्र म्हणून कल्याण-डोंबिवली परिसराचा विस्तार करण्यात येणार असून येथे २,५०० ते ३,५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी १,२३९ कोटी रुपयांच्या कल्याण वलय मार्ग
(पान ४ वर)


