नाैकेवर एलईडी लाईट लावून मासेमारी करणारी नाैका सहायक मत्स्य विभागाच्या पथकाने ताब्यात घेतली आहे. ही नाैका रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरात आणण्यात आली आहे. ही कारवाई रविवारी रात्री तालुक्यातील पूर्णगड समुद्रात करण्यात आली. ‘महिन’ नावाची ही नाैका माेहसीन अब्दुल गफूर वस्ता यांच्या मालकीची आहे.
मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी लतिका गावडे आणि सहायक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी रसिका सावंत पथकासोबत रविवारी रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान समुद्रात नौकेतून गस्त घालत होत्या. या गस्तीदरम्यान पूर्णगड समुद्रात ‘महिन’ (आयएनडी-एमएच-४-एमएम-५०९१) ही नाैका एलईडी लाईट लावून मासेमारी करत असल्याचे निदर्शनाला आले. त्यानंतर ही नाैका पथकाने नौका ताब्यात घेऊन मिरकरवाडा बंदरात आणली आहे. तसेच नाैकेवरील लाईट व लाईट पुरवणारी उपकरणेही जप्त करण्यात आली आहेत.
लईडी प्रकाशातील मासेमारी बेकायदेशीर असून, महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमनच्या सुधारीत नियमानुसार नौका मालकावर पाच लाख रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद आहे.