रेशनवर पुन्हा मिळणार साखर

0
112
रेशनवर पुन्हा मिळणार साखर
रेशनवर पुन्हा मिळणार साखर

रेशनवर पुन्हा मिळणार साखर

रत्नागिरी :

 महाराष्ट्र शासनाने दीड वर्षाच्या खंडानंतर अंत्योदय रेशन कार्डधारकांसाठी साखर वितरण पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ३८,५३५ शिधापत्रिकाधारक गरजू कुटुंबांना महिन्याला १ किलो साखर २० रुपये प्रति किलो दराने पुन्हा मिळणार आहे.
जिल्ह्यातील १३ गोदामांमध्ये २,१७२ क्विंटल साखर जमा झाली आहे. प्रत्येक महिन्याला ३७६.३३ क्विंटल साखरेची गरज जिल्ह्याला आहे. सध्या साखर वाटप प्रति एक किलोप्रमाणे सुरू आहे.
दीड वर्षापासून साखरवाटप बंद होते. तांदूळ आणि गहू असे धान्य प्रति कार्ड २५ किलो मोफत दिले जात होते. आता पुन्हा प्रत्येक महिन्याला या शिधापत्रिकाधारकांना एक किलो साखर देण्याचा निर्णय राज्याच्या पुरवठा विभागाकडून घेण्यात आला असल्याने या लाभार्थ्यांना त्याचा लाभ होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here