एलएलबी (३ वर्षे) CAP प्रवेश प्रक्रिया सुरू; पर्याय फॉर्म भरण्याची अंतिम मुदत ७ ऑगस्ट

0
13

मुंबई, प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष (CET Cell) मार्फत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी एलएलबी (३ वर्षांचा अभ्यासक्रम) केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया (CAP) सुरू करण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पर्याय (Option) फॉर्म भरण्याची अंतिम तारीख ७ ऑगस्ट २०२६ असल्याने मुदतीपूर्वी अर्ज पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सीईटी सेलने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, पर्याय फॉर्म भरण्यास ५ ऑगस्टपासून सुरुवात झाली असून ७ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम नोंदविता येणार आहेत. त्यानंतर ११ ऑगस्ट २०२६ रोजी फेरी-१ जागावाटप यादी (Allocation List) प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
जागा मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी १२ ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत कागदपत्र पडताळणी व प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील सविस्तर माहिती, वेळापत्रक आणि सूचनांसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे सीईटी सेलने म्हटले आहे.
महत्त्वाच्या तारखा
  • ५ ऑगस्ट २०२६ – पर्याय (Option) फॉर्म भरण्यास सुरुवात
  • ७ ऑगस्ट २०२६ – पर्याय फॉर्म भरण्याची अंतिम तारीख
  • ११ ऑगस्ट २०२६ – फेरी-१ जागावाटप यादी जाहीर
  • १२ ते १७ ऑगस्ट २०२६ – कागदपत्र पडताळणी व प्रवेश प्रक्रिया

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here