एसटीचा अत्याधुनिक सीसीटीव्ही प्रकल्प सुरू

0
27
एसटीचा अत्याधुनिक सीसीटीव्ही प्रकल्प सुरू
एसटीचा अत्याधुनिक सीसीटीव्ही प्रकल्प सुरू

एसटीचा अत्याधुनिक सीसीटीव्ही प्रकल्प सुरू

राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’च्या सुरक्षेला आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळणार आहे. दहशतवादी तसेच समाजविघातक प्रवृत्तींच्या संभाव्य धोक्यांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) प्रशासनाने महत्त्वाकांक्षी ‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्प’ हाती घेतला आहे.

या प्रकल्पांतर्गत एसटीच्या प्रमुख बसस्थानकांपासून ते विभागीय कार्यालयां -पर्यंत सर्व महत्त्वाच्या ठिकाणी अत्याधुनिक डिजिटल सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. यामुळे प्रवाशांची सुरक्षितता अधिक बळकट होणार असून कोणत्याही संशयास्पद हालचालींवर तत्काळ नजर ठेवणे शक्य होणार आहे.

परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी या उपक्रमाची माहिती देताना सांगितले की, प्रवाशांचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी आणि सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने एसटीच्या सर्व महत्त्वाच्या ठिकाणी अभेद्य डिजिटल सुरक्षा जाळे उभारले जाणार असून, ‘लालपरी’चा प्रवास अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह करण्याचा प्रशासनाचा निर्धार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here