ई-गव्हर्नन्समध्ये नवी मुंबई अव्वल पुणे दुसऱ्या क्रमांकावर

0
65
ई-गव्हर्नन्समध्ये नवी मुंबई अव्वल पुणे दुसऱ्या क्रमांकावर
ई-गव्हर्नन्समध्ये नवी मुंबई अव्वल पुणे दुसऱ्या क्रमांकावर

ई-गव्हर्नन्समध्ये नवी मुंबई अव्वल पुणे दुसऱ्या क्रमांकावर

मुंबई l प्रतिनिधी

महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या ई-गव्हर्नन्स कामगिरीचे मूल्यमापन करणाऱ्या Policy Research Organisation (PRO), पुणे यांनी जाहीर केलेल्या City E-Governance Index (CEGI) 2026 अहवालात नवी मुंबई महानगरपालिका राज्यात प्रथम क्रमांकावर तर पुणे महानगरपालिका दुसऱ्या क्रमांकावर विराजमान झाली आहे. सेवा उपलब्धता, पारदर्शकता आणि डिजिटल सुलभता या तीन प्रमुख स्तंभांवर आधारित शेकडो निकषांनुसार हे मूल्यांकन करण्यात आले.

१ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०२५

या कालावधीत महानगरपालिकांच्या अधिकृत संकेतस्थळे, मोबाईल अॅप्स आणि समाजमाध्यमांवरील कामगिरीचा अभ्यास करून निर्देशांक निश्चित करण्यात आला. मागील पाच वर्षांतील तुलनात्मक कामगिरीचा विचार करता नवी मुंबई महानगरपालिकेने ९.११ गुणांक मिळवत थेट पहिल्या स्थानावर झेप घेतल्याची घोषणा PROचे अध्यक्ष तन्मय कानिटकर यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत केली.

नवी मुंबई महानगरपालिकेने २४x७ ऑनलाइन सेवा, घरबसल्या प्रमाणपत्रे व करभरणा सुविधा, तक्रार निवारण यंत्रणा, अर्ज ट्रॅकिंग प्रणाली यांसारख्या नागरिकाभिमुख सेवा उपलब्ध केल्या आहेत. www.nmmc.gov.in ही अधिकृत वेबसाईट आणि ‘My NMMC’ मोबाईल अॅपद्वारे सुसंगत व अद्ययावत माहिती पुरविली जाते. ई-ऑफिस प्रणालीमुळे पेपरलेस प्रशासनाला चालना मिळाली असून ERP प्रणालीद्वारे विभागीय समन्वय सुधारला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here