एसटी प्रवास सवलतीसाठी १ ऑगस्टपासून NCMC कार्ड बंधनकारक

0
32
एसटी प्रवास सवलतीसाठी १ ऑगस्टपासून NCMC कार्ड बंधनकारक
एसटी प्रवास सवलतीसाठी १ ऑगस्टपासून NCMC कार्ड बंधनकारक
एसटी प्रवास सवलतीसाठी १ ऑगस्टपासून NCMC कार्ड बंधनकारक

महिला, ज्येष्ठ नागरिकांना प्रथम लागू; नोंदणी न केल्यास सवलतीऐवजी पूर्ण तिकीट भरावे लागणार

मुंबई | प्रतिनिधी

राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाच्या सवलतीच्या प्रवासासाठी १ ऑगस्ट २०२६ पासून नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) बंधनकारक करण्यात आले आहे. सुरुवातीच्या टप्प्यात महिला प्रवासी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी हा नियम लागू होणार असून, पात्र प्रवाशांनी वेळेत NCMC कार्ड काढून ते सक्रिय करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पहिल्या टप्प्यात महिला प्रवासी, ६५ ते ७५ वर्षे वयोगटातील ५० टक्के प्रवास सवलतधारक ज्येष्ठ नागरिक तसेच ७५ वर्षांवरील अमृत ज्येष्ठ नागरिक (मोफत प्रवास) यांच्यासाठी NCMC कार्ड अनिवार्य असेल.
यानंतरच्या टप्प्यात विद्यार्थी, दिव्यांग, विविध पुरस्कारप्राप्त व्यक्ती आणि इतर सर्व सवलतधारक प्रवाशांसाठीही NCMC कार्ड सक्तीचे करण्यात येणार आहे.
राज्यभर आतापर्यंत ५१ लाखांहून अधिक नागरिकांनी नोंदणी केली असून, २५ लाखांपेक्षा जास्त NCMC कार्ड सक्रिय करण्यात आली आहेत. या उपक्रमामुळे सवलतींचा गैरवापर रोखणे, तिकीट वितरणात पारदर्शकता आणणे आणि कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देणे हे उद्दिष्ट असल्याचे एसटी महामंडळाने स्पष्ट केले आहे.
पात्र प्रवाशांनी १ ऑगस्टपूर्वी अधिकृत केंद्रावर जाऊन NCMC कार्ड काढून ते सक्रिय करून घ्यावे, अन्यथा सवलतीचा लाभ मिळणार नाही आणि पूर्ण तिकीट दर भरावा लागू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here