भिवंडी परिमंडळ-२ मधील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव
पोलीस उपआयुक्तांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान
भिवंडी | प्रतिनिधी
भिवंडी परिमंडळ-२ अंतर्गत उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि अंमलदारांचा पोलीस उपआयुक्तांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

गंभीर गुन्ह्यांच्या तपासात उल्लेखनीय कामगिरी, कलम ३७६ अंतर्गत दाखल प्रकरणातील दोषसिद्धी, Dial 112 वर प्राप्त तातडीच्या कॉलला वेळेत प्रतिसाद, गुटखा वाहतूक प्रकरणातील प्रभावी कारवाई, उत्कृष्ट गुन्हे तपास तसेच एनबीडब्ल्यू (NBW) आरोपीला न्यायालयात हजर करण्यासाठी केलेल्या विशेष प्रयत्नांबद्दल संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.



