एसटी महामंडळात १३,५६७ पदांची भरती? सोशल मीडियावरील दावा खोटा

0
17
एसटी महामंडळात १३,५६७ पदांची भरती? सोशल मीडियावरील दावा खोटा
एसटी महामंडळात १३,५६७ पदांची भरती? सोशल मीडियावरील दावा खोटा

एसटी महामंडळात १३,५६७ पदांची भरती? सोशल मीडियावरील दावा खोटा

मुंबई –
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी महामंडळ) १३,५६७ पदांसाठी भरती सुरू असल्याचा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला दावा खोटा असल्याचे महामंडळाने स्पष्ट केले आहे.
एसटी महामंडळाच्या माहितीनुसार, सध्या अशा प्रकारची कोणतीही ‘निमशासकीय भरती’ प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही. सोशल मीडियावर प्रसारित होत असलेले भरतीचे पोस्टर बनावट असून, त्यामध्ये जाहिरात क्रमांक, अर्ज करण्याची अंतिम तारीख किंवा अधिकृत अर्जाची लिंक यांसारखी आवश्यक माहितीही उपलब्ध नाही.
त्यामुळे नागरिकांनी अशा व्हायरल पोस्टरवर विश्वास ठेवू नये किंवा त्याआधारे कोणत्याही व्यक्तीला अथवा संकेतस्थळाला पैसे देऊ नयेत. एसटी महामंडळातील भरतीसंदर्भातील अधिकृत माहिती केवळ महामंडळाच्या अधिकृत माध्यमांवरूनच तपासावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here