शौर्य पदक विजेते आणि कुटुंबीयांना आजीवन रेल्वे प्रवासाची सुविधा

0
21
शौर्य पदक विजेते आणि कुटुंबीयांना आजीवन रेल्वे प्रवासाची सुविधा
शौर्य पदक विजेते आणि कुटुंबीयांना आजीवन रेल्वे प्रवासाची सुविधा

शौर्य पदक विजेते आणि कुटुंबीयांना आजीवन रेल्वे प्रवासाची सुविधा

सेना, नौसेना आणि वायूसेना पदक (शौर्य) विजेत्यांसह पात्र कुटुंबीयांना प्रथम श्रेणी, सेकंड एसी व एसी चेअर कारमध्ये प्रवासाची सुविधा

नवी दिल्ली :
संरक्षण मंत्रालयाने भारतीय रेल्वेमध्ये सेना पदक, नौसेना पदक आणि वायूसेना पदक (शौर्य) विजेत्यांना तसेच त्यांच्या पात्र कुटुंबीयांना आजीवन रेल्वे प्रवास सुविधा देण्यास मंजुरी दिली आहे. या सुविधेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रथम श्रेणी, सेकंड एसी आणि एसी चेअर कारमध्ये प्रवास करता येणार आहे.
या सुविधेसाठी पात्र लाभार्थी इंडियन रेल्वे कन्सेशन कार्ड पोर्टलद्वारे ऑनलाइन नोंदणी करू शकतात. नोंदणी व आवश्यक कागदपत्रांच्या प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ई-पास ऑनलाइन तयार करण्यात येणार आहेत.
ई-पासच्या आधारे IRCTC वेब पोर्टलवरून तिकीट बुकिंगची सुविधा १ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू होणार आहे. त्यामुळे संबंधित शौर्य पदक विजेते आणि पात्र कुटुंबीयांना रेल्वे प्रवासासाठी ही सुविधा ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध होणार आहे.
या निर्णयामध्ये अविवाहित मरणोत्तर शौर्य पुरस्कार विजेत्यांच्या पालकांचाही समावेश करण्यात आला आहे. शौर्य पदक विजेते आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी रेल्वे प्रवास अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here