रामराजे कॉलेज ऑफ नर्सिंगचा उत्कृष्ट निकाल; यशाची परंपरा कायम

0
17
रामराजे कॉलेज ऑफ नर्सिंगचा उत्कृष्ट निकाल; यशाची परंपरा कायम
रामराजे कॉलेज ऑफ नर्सिंगचा उत्कृष्ट निकाल; यशाची परंपरा कायम

रामराजे कॉलेज ऑफ नर्सिंगचा उत्कृष्ट निकाल; यशाची परंपरा कायम

३२ विद्यार्थ्यांचा सहभाग; विशेष प्राविण्य, प्रथम व द्वितीय श्रेणीत विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी
दापोली प्रतिनिधी : अरविंद मांडवकर
महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व परावैद्यक परिषदेतर्फे जुलै २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या जी.एन.एम. (General Nursing and Midwifery) वार्षिक परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत रामराजे कॉलेज ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत महाविद्यालयाच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे.
या परीक्षेसाठी महाविद्यालयातील एकूण ३२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ४ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य, ६ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, तर २३ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी प्राप्त केली. विद्यार्थ्यांनी केलेल्या या गुणवत्तापूर्ण कामगिरीमुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.
महाविद्यालयात सिमी दिनेश कासारे हिने ७६.६० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. वृणाली दीपक शिंदे हिने ७४.६० टक्के गुणांसह द्वितीय, तर श्रावणी श्रीकांत दुबळे हिने ७२.६० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक संपादन केला.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे संस्थापक डॉ. संदीप राजपुरे व अध्यक्षा सौ. स्मिताली राजपुरे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. दर्जेदार नर्सिंग शिक्षण, प्रात्यक्षिकांवर दिला जाणारा विशेष भर आणि विद्यार्थ्यांची मेहनत यामुळे हे यश साध्य झाल्याचे संस्थापक डॉ. संदीप राजपुरे यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे महाविद्यालयाच्या प्राचार्या सुवर्णा जंगम यांच्यासह प्रा. पूजा कालेकर, प्रा. प्रशांती शिवणेकर, प्रा. संध्या नले आणि प्रा. प्राजक्ता रेमजे यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
उत्कृष्ट निकालाची परंपरा, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि व्यावसायिक कौशल्यावर भर या त्रिसूत्रीच्या जोरावर रामराजे कॉलेज ऑफ नर्सिंगने पुन्हा एकदा आपल्या शैक्षणिक गुणवत्तेची मोहोर उमटवली आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शैक्षणिक, वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here