तुळस येथे सलग दुसऱ्या वर्षी रंगणार राज्यस्तरीय भव्य भजन स्पर्धा; ‘प्रदेशाध्यक्ष चषक २०२६’चे आयोजन
तुळस येथे सलग दुसऱ्या वर्षी रंगणार राज्यस्तरीय भव्य भजन स्पर्धा; ‘प्रदेशाध्यक्ष चषक २०२६’चे आयोजन
तुळस, वेंगुर्ला :
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सन्मा. श्री. रविंद्रजी चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त RC ग्रुप तुळस यांच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी ‘प्रदेशाध्यक्ष चषक २०२६’ या राज्यस्तरीय भव्य निमंत्रित संगीत भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दि. २ व शनिवार दि. ३ ऑक्टोबर २०२६ रोजी तुळस येथे ही स्पर्धा रंगणार आहे.
गेल्या वर्षीच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर यंदाही मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यातील निमंत्रित भजन मंडळांना सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
पारितोषिके अशी :
प्रथम – २१ हजार व चषक, द्वितीय – १५ हजार व चषक, तृतीय – ११ हजार व चषक
उत्तेजनार्थ प्रथम ७ हजार, द्वितीय ५ हजार, तृतीय ३ हजार व चषक.
तसेच उत्कृष्ट गायक, पखवाजवादक, तबलावादक, कोरस, झांजवादक, शिस्तबद्ध संघ, हार्मोनियमवादक आणि उत्कृष्ट गजर यांना प्रत्येकी १ हजार व चषक देऊन गौरविले जाणार आहे. अचूक तीन क्रमांक सांगणाऱ्या भाग्यवान प्रेक्षकांनाही आकर्षक भेटवस्तू दिल्या जाणार आहेत.
स्पर्धेचे सादरीकरण पारंपरिक थाटात – प्रार्थना, जयकार/नोटेशन गीत, रुपावली, संत तुकाराम महाराज अभंग, छत्रपती शिवाजी महाराज गजर, संत नामदेव/एकनाथ महाराज गौळण आणि अंतिम गजर असा असेल.
प्रत्येक मंडळात ८ ते १२ सदस्य, सादरीकरणासाठी ४५ मिनिटे, अंतिम गजरात पखवाज-तबला जुगलबंदीसाठी ३ ते ५ मिनिटे राखीव. इलेक्ट्रॉनिक तानपुरा वगळता इतर इलेक्ट्रॉनिक वाद्यांना परवानगी नाही.
स्पर्धेचे YouTube Live प्रक्षेपण होणार असून परीक्षक म्हणून श्री. दिप्तेश मेस्त्री आणि श्री. मनिष तांबोसकर काम पाहणार आहेत.
या भव्य स्पर्धेचा भजनप्रेमींनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन RC ग्रुप तुळसने केले आहे.