ऐरोली आणि जोगेश्वरी येथे १ व २ ऑगस्टला रंगणार ‘कोकणी बाजारपेठ’

0
31
ऐरोली आणि जोगेश्वरी येथे १ व २ ऑगस्टला रंगणार ‘कोकणी बाजारपेठ’
ऐरोली आणि जोगेश्वरी येथे १ व २ ऑगस्टला रंगणार ‘कोकणी बाजारपेठ’

ऐरोली आणि जोगेश्वरी येथे १ व २ ऑगस्टला रंगणार ‘कोकणी बाजारपेठ’

मराठी उद्योजकांना पाठबळ देण्याचे आवाहन

मुंबई :
कोकणातील आणि मराठी उद्योजकांनी तयार केलेली दर्जेदार उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने ‘कोकणी बाजारपेठ’ या विशेष प्रदर्शन-विक्री मेळाव्याचे आयोजन १ आणि २ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ही बाजारपेठ ऐरोली आणि जोगेश्वरी या दोन ठिकाणी एकाच वेळी भरत असून ग्राहकांना विविध उत्पादने आणि खरेदीचा आनंद एका छताखाली अनुभवता येणार आहे.

सकाळी ११.०० ते रात्री ९.०० या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या या बाजारपेठेत मराठी उद्योजकांनी आणलेल्या अनेक उपयुक्त वस्तू, घरगुती उत्पादने, खाद्यपदार्थ, हस्तकला वस्तू तसेच विविध आकर्षक उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री होणार आहे.
“प्रत्येक खरेदीतून एका मराठी उद्योजकाला तुमची साथ मिळते,” हा संदेश देत आयोजकांनी नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि स्वदेशी उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.
हा उपक्रम मिशन कोकण साम्राज्य आणि कोकणचा शिलेदार (Kokancha Shiledar) यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here