ऑकलंड मराठी असोसिएशनच्या गणपती बाप्पाचे भक्तिभावाने दर्शन

0
15
ऑकलंड मराठी असोसिएशनच्या गणपती बाप्पाचे भक्तिभावाने दर्शन
ऑकलंड मराठी असोसिएशनच्या गणपती बाप्पाचे भक्तिभावाने दर्शन

ऑकलंड मराठी असोसिएशनच्या गणपती बाप्पाचे भक्तिभावाने दर्शन

ऑकलंड :
न्यूझीलंडमधील ऑकलंड मराठी असोसिएशन (AMAI) यांच्या वतीने विराजमान करण्यात आलेल्या श्री गणरायाचे भक्तिभावाने दर्शन घेण्यात आले.
परदेशातही मराठी संस्कृती, परंपरा आणि गणेशोत्सवाची परंपरा जपण्याचे काम ऑकलंड मराठी असोसिएशनच्या माध्यमातून केले जात आहे. गणेशोत्सवानिमित्त मंडळात धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, मराठी बांधवांनी उत्साहाने सहभाग घेतला.
गणपती बाप्पाच्या दर्शनाने ऑकलंडमधील मराठी बांधवांमध्ये आनंदाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले. महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा सुगंध सातासमुद्रापारही दरवळत असल्याचे यानिमित्ताने पाहायला मिळाले.
गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here