महिला १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात भारताला रौप्यपदक
इलावेनिल वलारिवन, सोनम मस्कर आणि विदर्सा के. विनोद यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन
मुंबई :
आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताने पदकाचे खाते रौप्यपदकाने उघडले आहे. महिलांच्या १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात इलावेनिल वलारिवन, सोनम मस्कर आणि विदर्सा के. विनोद या भारतीय त्रिकुटाने रौप्यपदक पटकावले. भारतीय संघाने १८९८.० गुणांची नोंद करत दुसरे स्थान मिळवले. चीनने १९०४.२ गुणांसह सुवर्णपदक पटकावले, तर जपानने कांस्यपदक मिळवले.



