‘ऑल इंडिया एअरपोर्टस्‌ एव्हिएशन एम्प्लॉईज युनियन’ च्या वार्षिक सर्वसाधारण सभा

0
20

‘ऑल इंडिया एअरपोर्टस्‌ एव्हिएशन एम्प्लॉईज युनियन’ च्या वार्षिक सर्वसाधारण सभा

शिवसेना पुरस्कृत ‘ऑल इंडिया एअरपोर्टस्‌ एव्हिएशन एम्प्लॉईज युनियन’ च्या वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित राहून संघटनेच्या पदाधिकारी व सभासदांशी संवाद साधला – मंत्री उदय सामंत.

यावेळी बोलतांना, देशाच्या आणि राज्याच्या दळणवळण व्यवस्थेत विमानतळ कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असून, त्यांच्या न्याय्य हक्कांचे संरक्षण करणे, त्यांच्या समस्या सोडवणे आणि त्यांना उत्तम सोयी-सुविधा मिळवून देणे ही आमची जबाबदारी आहे. संघटनेच्या पुढील वाटचालीस आणि सर्व सहकाऱ्यांना शुभेच्छा दिल्यात.
विमान वाहतूक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांच्या लढ्याला बळ देण्यासाठी शिवसेना सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी दिली.
यावेळी ऑल इंडिया एअरपोर्टस्‌ एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनचे कुणाल सरमळकर, उपाध्यक्ष संजू शहा, भारती गावकर, विनोद कांबळे या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह पक्षाचे कामगार सेनेचे प्रमुख प्रतिनिधी, विमानतळ आणि विमान वाहतूक क्षेत्रातील कर्मचारी, संघटना सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here