व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास सहा महिन्यांची मुदत

0
31

मुंबई, दि. ३ : राज्यातील विद्यार्थ्यांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेत, सन २०२६–२७ या शैक्षणिक वर्षासाठी अभियांत्रिकी, वैद्यकीय तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशानंतर जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.
या निर्णयामुळे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती-भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय तसेच इतर आरक्षण प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेदरम्यान जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यामुळे प्रवेशापासून वंचित राहावे लागणार नाही.
शासनाच्या निर्णयानुसार, पात्र उमेदवारांना संबंधित शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतल्यानंतर सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. या कालावधीत विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून सक्षम जात पडताळणी समितीकडून प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया पूर्ण करावी.
प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पडावी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळावे आणि जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यास होणारा विलंब लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.
विद्यार्थी व पालकांनी प्रवेश घेतल्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया वेळेत पूर्ण करून निर्धारित मुदतीत संबंधित संस्थेकडे प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here