ओंकार हत्ती प्रकरण : खुलासे, आरोप, प्रति-आरोप आणि वस्तुस्थिती
कळणे l
ओंकार हत्तीने कळणे गावात प्रवेश केल्यानंतर घडलेल्या एका घटनेच्या अनुषंगाने दैनिक सिंधुदुर्ग समाचारच्या दिनांक १२ डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध झालेल्या बातमीवरून कळणे सरपंच अजित देसाई यांनी दिलेल्या खुलाशामुळे या प्रकरणाला नव्या वळणावर नेण्याचा प्रयत्न होत आहे. या खुलाशाबाबत दैनिक सिंधुदुर्ग समाचारमध्ये स्वतंत्रपणे व सविस्तर बातमी देण्यात येत असून, त्याचबरोबर आमच्या मूळ बातमीबाबत उपस्थित करण्यात आलेल्या आक्षेपांवर वस्तुनिष्ठ, कायदेशीर आणि मुद्देसूद भूमिका मांडणेही आवश्यक ठरते. कारण या खुलाशांमध्ये दैनिक सिंधुदुर्ग समाचारच्या बातमीवर जे आरोप करण्यात आले आहेत, ते वस्तुस्थितीपेक्षा भावनिक अधिक आणि कायदेशीरदृष्ट्या अस्थिर असल्याने त्यास सविस्तर, मुद्देसूद व कायदेशीर उत्तर देणे अपरिहार्य ठरते.
सर्वप्रथम हे ठामपणे नोंदवणे आवश्यक आहे की दैनिक सिंधुदुर्ग समाचारमध्ये प्रसिद्ध झालेली मूळ बातमी ही कोणत्याही विशिष्ट व्यक्तीविरोधात, ग्रामस्थांविरोधात, समाजविरोधात किंवा धर्मविरोधात नव्हती. बातमीचा केंद्रबिंदू केवळ एकच होता आणि तो म्हणजे ओंकार हत्तीला आक्रमक ठरवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कथनांमध्ये असलेली विसंगती, त्यासाठी सादर करण्यात येणाऱ्या पुराव्यांचा अभाव आणि त्या पार्श्वभूमीवर वनविभागाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात का सापडते, हा प्रश्न.
कळणे सरपंच अजित देसाई यांनी त्यांच्या खुलाशात असा दावा केला आहे की ओंकार हत्तीने बैलाला गंभीर दुखापत केली आणि त्या वेळी ग्रामस्थ तसेच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते. मात्र, याच ठिकाणी एक अत्यंत महत्त्वाचा, वैज्ञानिक तसेच कायदेशीर मुद्दा पुढे येतो. हत्ती हा स्वभावतः आक्रमक प्राणी नसतो. एखादा हत्ती जर आक्रमक होऊन पाळीव प्राण्यावर प्राणघातक हल्ला करतो, तर त्याचे परिणाम केवळ एका जखमेपुरते मर्यादित राहत नाहीत. गोठ्याची मोडतोड, आजूबाजूच्या परिसरातील संरचनात्मक नुकसान, जमिनीवर ठसे, तसेच जनावराच्या शरीरावर अनेक गंभीर व विद्रूप जखमा दिसून येतात. या प्रकरणात अशा स्वरूपाचा कोणताही अधिकृत पंचनामा, छायाचित्रे किंवा वनविभागाचा लेखी अहवाल अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही.
वन्यजीव तज्ज्ञांच्या माहितीनुसार हत्तींकडून शेतीचे नुकसान होणे हे वास्तव आहे. केळी बागायत, भातशेती, ऊस यांचे नुकसान हत्ती करू शकतो. मात्र एखाद्या प्रौढ, बैलाचा मृत्यू हत्तीच्या हल्ल्यामुळे झाला, असा निष्कर्ष काढण्यासाठी शवविच्छेदन अहवाल, जखमांचे वैज्ञानिक विश्लेषण आणि अधिकृत निष्कर्ष आवश्यक असतो. या पैकी कोणताही ठोस पुरावा अद्याप समोर आलेला नसताना, ‘हत्तीने बैलाला चिरडून ठार मारले’ असा दावा अंतिम सत्य म्हणून मांडणे हेच आमच्या बातमीतील प्रश्नाचे मूळ होते.
कळणे सरपंच अजित देसाई यांनी दिलेल्या खुलाशामध्ये आमच्या बातमीतील शब्दप्रयोगांवर आक्षेप घेण्यात आला आहे. मात्र हे लक्षात घेणे आवश्यक आहे की पत्रकारितेमध्ये प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार घटना वर्णन केली जाते. ‘पाय ठेवला’, ‘जखमी केले’, ‘चिरडले’ या शब्दांमधील भाषिक फरक हा हेतुपुरस्सर बदनामी करण्यासाठी नसून वृत्तलेखनाच्या शैलीचा भाग असतो. अशा शब्दप्रयोगांवरून दुर्भावना लावणे हे कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य धरता येत नाही.
या प्रकरणात सर्वात गंभीर आणि वस्तुस्थितीला धरून नसलेला आरोप म्हणजे आमच्या बातमीमुळे धार्मिक तेढ निर्माण झाल्याचा. या संदर्भात दैनिक सिंधुदुर्ग समाचार पुन्हा एकदा स्पष्ट करतो की आमच्या मूळ बातमीत कुठेही मृत बैलाच्या मालकाचा धर्म, जात, समाज किंवा वैयक्तिक ओळख यांचा उल्लेख करण्यात आलेला नाही. कोणताही धार्मिक संदर्भ, तुलना किंवा संकेत आमच्या बातमीत नाही. त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा किंवा तेढ निर्माण झाल्याचा आरोप हा पूर्णतः तथ्यहीन, काल्पनिक आणि कायदेशीरदृष्ट्या असंगत आहे.
उलटपक्षी, एखाद्या घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न हा आमच्या बातमीचा नव्हे, तर त्या बातमीवर प्रतिक्रिया देणाऱ्यांच्या निवेदनातून निर्माण होत असल्याचे स्पष्ट दिसते. माध्यमांनी केवळ प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला म्हणून त्यावर धार्मिक हेतू लादणे, हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न मानावा लागेल.
दैनिक सिंधुदुर्ग समाचारने कुठेही ग्रामस्थ प्राणिद्वेषी आहेत, असा आरोप केलेला नाही. गावकऱ्यांनी हत्तीला मानाने मार्ग काढून देण्याचे अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत, हे वास्तव आम्हालाही मान्य आहे. मात्र, भावना, श्रद्धा आणि आदर या बाबी मान्य करतानाच प्रशासनाने आपली कर्तव्ये पार पाडली का, हा प्रश्न विचारणे हे पत्रकारितेचे कर्तव्य आहे.
या संपूर्ण प्रकरणात आजही एक मूलभूत प्रश्न अनुत्तरित आहे. हत्तीने बैलाला ठार मारल्याचा अधिकृत निष्कर्ष नेमका कोणी, केव्हा आणि कोणत्या वैज्ञानिक व कायदेशीर पुराव्यांच्या आधारे काढला? जर असा अधिकृत निष्कर्ष अस्तित्वात नसेल, तर माध्यमांनी प्रश्न विचारणे हे चुकीचे कसे ठरू शकते?
म्हणूनच दैनिक सिंधुदुर्ग समाचार हे ठामपणे नमूद करतो की आम्ही कोणत्याही व्यक्तीची, पदाची किंवा संस्थेची बदनामी केलेली नाही. आम्ही केवळ उपलब्ध माहिती, प्रत्यक्ष परिस्थिती आणि प्रशासनाकडून मिळणाऱ्या अपुऱ्या उत्तरांच्या आधारे लोकहितार्थ प्रश्न उपस्थित केले आहेत. सरपंच अजित देसाई व शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींनी दिलेला खुलासा वाचकांसमोर मांडणे हे आमचे कर्तव्य आहेच; त्याचबरोबर त्या खुलाशातील दाव्यांबाबत वस्तुस्थिती मांडणे व प्रश्न उपस्थित करणे हेही जबाबदार पत्रकारितेचे अंग आहे.

ओंकार हत्ती प्रकरणी सरपंच अजित देसाई यांचा खुलासा
कळणे I
ओंकार हत्ती प्रकरणावरून प्रसिद्ध झालेल्या बातमीबाबत कळणे गावचे सरपंच अजित देसाई यांनी आपली भूमिका स्पष्ट करत खुलासा केला आहे. ओंकार हत्ती कळणे गावात दाखल झाल्यापासून आपण व ग्रामस्थ सातत्याने त्याच्या संपर्कात होते आणि बैलाला दुखापत झाल्याच्या वेळी वनसंरक्षक अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ घटनास्थळी उपस्थित होते, असे त्यांनी नमूद केले.
हत्तीविषयी गावकऱ्यांचा कोणताही आकस किंवा द्वेष नसून, उलट वनविभागाच्या मार्गदर्शनानुसार त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासाकडे सुरक्षित मार्गदर्शन करण्यात आले, असे सरपंचांनी स्पष्ट केले. या काळात हत्तीवर कोणतीही दगडफेक किंवा प्राणघातक कृती करण्यात आलेली नाही, असेही त्यांनी सांगितले.
आपण समस्त हिंदू समाज सहिष्णू आणि प्राणीप्रेमी असल्याचे सांगताना त्यांनी नमूद केले की, क्षत्रिय समाजात मांसाहार असणे म्हणजे प्राणी-द्वेषी असणे नव्हे. तसेच हत्तीला गणरायाचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे ओंकार हत्तीला गावातून मानाने आणि श्रद्धेनेच मार्ग देण्यात आला.
घटनेबाबत पत्रकारांना दिलेल्या तोंडी माहितीत बैलावर हत्तीचा पाय पडून गंभीर दुखापत झाल्याचे सांगितले गेले होते. मात्र वृत्तलेखनात ‘चिरडून मारले’ असा शब्दप्रयोग वापरल्यामुळे संभ्रम निर्माण झाला असावा, असे त्यांनी सांगितले. याचप्रमाणे प्रसिद्धी पत्रकात मृत बैलाचा पाय आधीच कापलेला होता, असा उल्लेख केल्याबाबत त्यांनी आक्षेप घेतला असून, कोणताही संवेदनशील नागरिक जाणीवपूर्वक अशी क्रूर कृती करेल, हे मान्य होऊ शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
मृत बैलाचा मालक मुस्लिम समाजाचा असल्याचा उल्लेख करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे का, असा सवाल उपस्थित करत आपण किंवा ग्रामस्थ प्राणीविरोधी नसल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले. जर गावकरी प्राणीमित्र नसते, तर ओंकार हत्तीला गावातून मानाने मार्ग दिलाच नसता, असेही सरपंच अजित देसाई यांनी स्पष्ट केले.