ओरोसमध्ये गॅस सिलेंडरसाठी अभूतपूर्व गर्दी; नागरिकांच्या लांबच लांब रांगा

0
25
ओरोसमध्ये गॅस सिलेंडरसाठी अभूतपूर्व गर्दी; नागरिकांच्या लांबच लांब रांगा
ओरोसमध्ये गॅस सिलेंडरसाठी अभूतपूर्व गर्दी; नागरिकांच्या लांबच लांब रांगा

ओरोसमध्ये गॅस सिलेंडरसाठी अभूतपूर्व गर्दी; नागरिकांच्या लांबच लांब रांगा

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या ओरोस येथे घरगुती गॅस सिलेंडरसाठी आज नागरिकांच्या अभूतपूर्व रांगा पाहायला मिळाल्या. येथील Vasant Gas Agency बाहेर सकाळपासूनच ग्राहकांनी मोठी गर्दी केल्याने परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सुमारे ९ वाजल्यापासूनच नागरिकांनी सिलेंडर मिळवण्यासाठी एजन्सीबाहेर रांगा लावण्यास सुरुवात केली. पाहता पाहता ही रांग इतकी वाढली की रस्त्यावर लोकांसह वाहनांचीही मोठी गर्दी झाली. ओरोस येथे गॅस सिलेंडरसाठी अशा प्रकारे लांबच लांब रांगा लागल्याचे प्रथमच पाहायला मिळत असल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत.

गॅसचा पुरवठा विस्कळीत होणार असल्याच्या चर्चेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. “खरोखरच गॅसची टंचाई आहे की केवळ अफवांमुळे नागरिक घाबरून सिलेंडर घेण्यासाठी गर्दी करत आहेत?” असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. अनेक नागरिक ‘गॅस मिळणार नाही’ या भीतीने वेळेआधीच सिलेंडर मिळवण्यासाठी धडपड करत असल्याचे चित्र दिसून आले.

दरम्यान, गॅस सिलेंडरचा पुरवठा लवकरात लवकर सुरळीत झाला नाही तर परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन पुरवठा नियमित करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. सध्या तरी या रांगांमुळे ओरोसमध्ये ‘गॅस टंचाई’च्या चर्चेला जोर आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here