कणकवलीत छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात होणार
कणकवली l प्रतिनिधी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कणकवली तालुक्याच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती गुरुवार, १९ फेब्रुवारी रोजी उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. सकाळी १०.३० वाजता कणकवली येथील आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास युवासेना जिल्हाप्रमुख, महिला जिल्हा संघटक, तालुकाप्रमुख, विविध आघाड्यांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, तसेच शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमादरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार असून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे. शिवचरित्रावर आधारित प्रेरणादायी भाषणांचे आयोजनही करण्यात येणार आहे.
तसेच सर्व आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शिवसैनिक आणि शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन शिवसेना कणकवली तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्या वतीने करण्यात आले आहे.


