कणकवलीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने शायना एनसीच्या फोटोला जोडे मारून केला निषेध

0
7
कणकवलीत शायना एनसी यांच्या फोटोला जोडे मारून ठाकरे शिवसेनेचे आंदोलन
कणकवलीत शायना एनसी यांच्या फोटोला जोडे मारून ठाकरे शिवसेनेचे आंदोलन

कणकवलीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने शायना एनसीच्या फोटोला जोडे मारून केला निषेध

बाळासाहेबांचा फोटो फाडणाऱ्या शायना एनसीला पाठीशी घालणाऱ्या शिंदे गटाचाही केला निषेध

कणकवली:
शिंदे शिवसेनेची राष्ट्रीय प्रवक्ती शायना एनसी हिने बाळासाहेबांचा फोटो फाडल्याच्या निषेधार्थ आज महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव यांच्या नेतृत्वाखाली कणकवली तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने शिवसेना शाखा येथे शायना एनसीच्या फोटोला “जोडे मारो” आंदोलन केले. याप्रसंगी बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या शायना एनसीला पाठीशी घालणाऱ्या शिंदे गटाचा निषेध असो! शायना एनसी हाय हाय! शायना एनसी मुर्दाबाद! शायना एनसीचे करायचे काय खाली डोके वर पाय! अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी जिल्हाप्रमुख मा. आ. वैभव नाईक, कणकवली विधानसभा प्रमुख सुशांत नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सौ. नीलम पालव म्हणाल्या, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी संघर्ष केला.त्यासाठी त्यांनी शिवसेना पक्षाची स्थापना केली. तो पक्ष शिंदे गटाने चोरून, परप्रांतीय शायना एनसीला हाताशी धरून, शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचा फोटो फाडला आहे. त्यामुळे बाळासाहेबांचा घोर अपमान झाला असून याचा आम्ही सर्व शिवसैनिक तीव्र निषेध करतो. महायुती सरकार असंवेदनशील असून त्यांनी महाराष्ट्रात कुठलेही चांगले काम न करता निव्वळ असे खोडसाळ चाळे करून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचे काम केले आहे. शायना एनसीने जे कृत्य केले त्यामुळे राज्यातील तमाम शिवसैनिकांचाही अपमान झाला असून शायना एनसी जिथे मिळेल तिथे तिला चप्पलाचे जोडे मारले पाहिजेत असे आवाहन नीलम पालव यांनी केले.
याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कणकवली तालुकाप्रमुख राजू राठोड, नगरसेवक संकेत नाईक, राजू राणे, युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, दिव्या साळगावकर,संजना कोलते, ॲड. हर्षद गावडे, विभागप्रमुख विलास गुडेकर,बबली राणे,रवींद्र खांदारे,रुपेश आमडोसकर, नितीन राऊळ, महेश देसाई,रोहित राणे, अजित काणेकर,अरुण परब, पराग म्हापसेकर, प्रमोद सावंत,सुरेंद्र पाटेकर,सुरेश मेस्त्री,मंगेश राणे,चेतन वालावलकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here