कुर्ली गावच्या श्री कुर्लादेवीचा वार्षिक त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव मंगळवारी
कुर्ली गावच्या श्री कुर्लादेवीचा वार्षिक त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव मंगळवारी
वैभववाडी ( तुषार शिंगाडे )
वैभववाडी तालुक्यातील कुर्ली येथील प्रसिद्ध जागृत देवस्थान श्री कुर्लादेवीचा वार्षिक त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव (टिपर) श्री कुर्ला देवी मंदिर-वडाचे भरड येथे मंगळवार, २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वा. ते उत्तर रात्री पर्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा होणार आहे. या निमित्त सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
स. ८ वा. ग्रामदेवतांची पूजा, स. ८.३० वा. देवीच्या मूर्तीला अभिषेक, स. १०.३० वा. श्री कुर्लादेवी उत्सव मूर्तीला आभूषण-अलंकार चढविणे. स. ११ वा. श्री गणेशपूजन त्यानंतर स. ११.३० वा. देवीची महापूजा, दु. १२ वा. महाआरती, सामुदायिक गाऱ्हाणे, दु. १२.३० वा. महाप्रसाद, दु. १.३० वा. लोटांगण (नौशिक व सामुदायिक लोटांगण), सायं. ५.३० वा. देवीला बारा पाचांची गाऱ्हाणे करून टवळे ठेवणे. सायं. ६ वा. मानकऱ्यांच्या देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम, सायं. ६.३० वा. भाविकांचा देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम, रात्री ८ वा. पासून नवस फेडणे व नवीन नवस देवीला बोलणे कार्यक्रम होणार आहे. मध्यरात्री २ वा. शिवकळा व देवरहाटी दिंडीचे आगमन, मध्यरात्री २.३० वा. दीपोत्सव (टीपर पाजळणे), मध्यरात्री ३.३० वा. पालखी प्रदक्षिणा (मंदिराभोवती पाच फेऱ्या), ६ वा. सामुदायिक गाऱ्हाणे व काकड आरती करण्यात येणार आहे.
भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती कुर्ली, मानकरी बारा-पाच, कुर्ली ग्रामस्थ यांनी केले आहे.