कणकवलीत २४ नोव्हेंबरपासून आर्ट ऑफ लिव्हिंगचा ‘हॅपिनेस प्रोग्राम’
कणकवलीत २४ नोव्हेंबरपासून आर्ट ऑफ लिव्हिंगचा ‘हॅपिनेस प्रोग्राम’
सुदर्शन क्रिया, योगासने, प्राणायाम, ध्यान आणि तणावमुक्त जीवन जगण्याचे मिळणार प्रशिक्षण
कणकवली :
आर्ट ऑफ लिव्हिंग, सिंधुदुर्गच्या वतीने कणकवली येथे २४ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत ‘हॅपिनेस प्रोग्राम’चे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम उमेश वायंगणकर यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज सकाळी ६ ते ८.३० या वेळेत उत्कर्ष हॉल, कणकवली एसटी स्टँडसमोर येथे होणार आहे.
या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांना सुदर्शन क्रिया, योगासने, प्राणायाम, ध्यान (मेडिटेशन) तसेच व्यावहारिक ज्ञान (प्रॅक्टिकल विज्डम) यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. धकाधकीच्या जीवनात निर्माण होणारा ताण कमी करणे, मानसिक स्वास्थ्य सुधारणे, उत्साह व सकारात्मकता वाढविणे, निरोगी आणि आनंदी जीवन जगणे, रोगप्रतिकारशक्ती वाढविणे, अस्वस्थता कमी करणे, तणावमुक्त राहणे आणि आरोग्याची काळजी घेण्याबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे.
या कार्यक्रमासाठी ऑनलाइन नोंदणी सुरू असून इच्छुकांनी https://aolt.in/1077782 या लिंकवर नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी उमेश वायंगणकर (९६५७४७९८६६), राखी मालवणकर (९४०४९४४६२८), सुनील बाणे (९४२२३८११०५), मोहन काणेकर (९४२२३७३३२५), शंकर धुरी (९४२२०६४६८१), बाळकृष्ण सावंत (९३२२९४९२६६), भगवान लोके (९४२२३९४५०५) , पंढरीनाथ गुरव (९५७९३२३२४३) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे केले आहे.