महाराष्ट्राच्या सागरी विकासासाठी नॉर्वेसोबत सहकार्याची चर्चा; मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत बैठक

0
6
महाराष्ट्राच्या सागरी विकासासाठी नॉर्वेसोबत मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत बैठक
महाराष्ट्राच्या सागरी विकासासाठी नॉर्वेसोबत मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत बैठक

महाराष्ट्राच्या सागरी विकासासाठी नॉर्वेसोबत सहकार्याची चर्चा; मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत बैठक

मुंबई :
महाराष्ट्रातील सागरी तंत्रज्ञान, शाश्वत सागरी खाद्य उत्पादन, मत्स्यपालन आणि सागरी पायाभूत सुविधांचा विकास करण्याच्या दृष्टीने नॉर्वेजियन शिष्टमंडळासोबत मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत महाराष्ट्र आणि नॉर्वे यांच्यातील सहकार्याच्या विविध संधींवर चर्चा करण्यात आली.

महाराष्ट्राचे सागरी आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्र अधिक सक्षम करण्यासह राज्यातील मच्छीमार समुदायासाठी रोजगार व व्यवसायाच्या नवीन संधी निर्माण करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. बंदरांच्या पायाभूत सुविधांचा विकास, जहाजबांधणी, जहाजांची दुरुस्ती आणि आधुनिक मत्स्यपालन पद्धती या क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञान हस्तांतरण, आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम कार्यपद्धतींचा अवलंब आणि संभाव्य भागीदारी याबाबत सविस्तर विचारविनिमय झाला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून जागतिक कौशल्य, आधुनिक तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण संकल्पना महाराष्ट्रात आणण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीला नॉर्वेजियन सस्टेनेबल सीफूडचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी हेनिंग बोर्वे फिगेन्शौ, अ‍ॅव्हलॉन मोरेचे व्यवस्थापकीय संचालक स्वेन ओडवार ओसेन, नॉर्वे इंडिया चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे (NICCI) मुख्य कार्यकारी अधिकारी ट्रॉन्ड स्कुंडबर्ग आणि NICCI प्रतिनिधी मंडळाचे प्रतिनिधी अस्पॉय ब्योर्न रॉय उपस्थित होते.
याशिवाय महाराष्ट्र मत्स्य विभाग, महाराष्ट्र मत्स्य विकास महामंडळ आणि महाराष्ट्र सागरी मंडळाचे वरिष्ठ अधिकारीही बैठकीला उपस्थित होते. या चर्चेमुळे राज्यातील सागरी अर्थव्यवस्था, मत्स्यव्यवसाय आणि बंदर विकासासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या नव्या शक्यता पुढे आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here