विनोद झगडे यांच्या सुवर्णमहोत्सवी वाढदिवसानिमित्त पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या शुभेच्छा

0
9

चिपळूण :

चिपळूण पंचायत समितीचे सदस्य श्री. विनोद झगडे यांच्या सुवर्णमहोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी उपस्थित राहून त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

सार्वजनिक जीवनात कार्यरत असताना समाजाशी जपलेले आपुलकीचे नाते आणि जनसेवेप्रती असलेली बांधिलकी ही अत्यंत महत्त्वाची असते. श्री. विनोद झगडे यांनी सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रात केलेल्या कार्याचा गौरव करताना त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभावे तसेच आगामी सामाजिक व सार्वजनिक वाटचालीत भरभरून यश मिळावे, अशा सदिच्छा पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केल्या.

या अभिष्टचिंतन सोहळ्याला माजी आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, अभिनेते प्रभाकर मोरे, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, सचिन कदम, तालुकाप्रमुख रुपेश घाग, दिलीप चव्हाण, पंचायत समिती महिला व बालकल्याण सभापती मयुरी शिर्के, पंचायत समिती सभापती सूर्यकांत खेतले, उपसभापती बापू आयरे, कृषी सभापती महेश नाटेकर, गुहागर सभापती प्रणव पोळेकर, तहसीलदार प्रवीण लोकरे, मयूर खेतले, जिल्हा परिषद सदस्या विनया झगडे, उपतालुकाप्रमुख पूनम चाळके आणि माजी सभापती धनश्री शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here