कराडमध्ये २१ व्या राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन

0
5
कराडमध्ये २१ व्या राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन
कराडमध्ये २१ व्या राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन

कराडमध्ये २१ व्या राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन

कराड :
कराड येथील शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये आयोजित २१ व्या राज्यस्तरीय स्व. यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक, पशुपक्षी प्रदर्शन व जिल्हा कृषी महोत्सव २०२६ चे उद्घाटन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.

या कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, सुधारित बियाणे, कृषी अवजारे, सिंचन पद्धती आणि नाविन्यपूर्ण कृषी प्रयोगांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची ओळख करून देणारे हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
महोत्सवात भाजीपाला उत्पादन, फळबाग लागवड, पशुपालन, ऊस शेती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा शेतीतील वापर अशा विविध विषयांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले जाणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि सुधारित शेती पद्धतींचा अवलंब करून शेतीची उत्पादकता वाढविण्यासह आर्थिक समृद्धी साधण्यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरेल.
यंदा राज्यातील अनेक भागांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती आणि पाणीटंचाईचे आव्हान निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर दुष्काळी परिस्थितीत ऊस पीक व्यवस्थापन, चारा पिकांच्या लागवडीचे तंत्रज्ञान, ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि सेंद्रिय शेती अशा महत्त्वपूर्ण विषयांवर तज्ज्ञांचे परिसंवाद व चर्चासत्रे आयोजित करण्यात आली आहेत.
बदलत्या हवामान परिस्थितीशी जुळवून घेत शेती अधिक शाश्वत आणि फायदेशीर करण्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक ज्ञान व आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती या महोत्सवातून मिळणार आहे.
या कृषी प्रदर्शनाने राज्यस्तरावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली असून दरवर्षी लाखो शेतकरी, कृषीप्रेमी आणि नागरिक या प्रदर्शनाला भेट देतात. शेतकऱ्यांच्या परिसरातच आधुनिक कृषी तंत्रज्ञान, प्रगत शेती पद्धती आणि नवनवीन प्रयोगांची माहिती उपलब्ध करून देणारा हा उपक्रम कृषी क्षेत्राच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here