कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून सरकारवर टीका; “अटक करून प्रश्न सुटणार नाहीत”
कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांकडे दुर्लक्ष करून आंदोलकांना अटक करण्याचा मार्ग सरकारने स्वीकारल्याने संतापाची लाट उसळली आहे. आंदोलन दडपण्यासाठी पोलिसी शक्तीचा वापर केला जात असल्याची टीका आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे.



