साखर उद्योग आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; केंद्र सरकारकडून लवकरच सकारात्मक निर्णयाची शक्यता

0
83

नवी दिल्ली :
महाराष्ट्रातील साखर कारखानदारी, ऊस व कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

या बैठकीत साखरेची किमान आधारभूत किंमत वाढवणे, इथेनॉल कोटा वाढवणे, कर्ज पुनर्गठन, व्याज सवलत, कांदा खरेदी, कांदा बियाण्यांवरील एक्सपोर्ट सरचार्ज आणि कांद्याचे ग्रेडिंग यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली.
नाफेड आणि एनसीसीएफमार्फत थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करण्याची मागणी मान्य करण्यात आली असून, कांदा खरेदीचे उद्दिष्ट २ लाख टनांवरून १० लाख टनांपर्यंत वाढवण्याबाबतही सकारात्मक संकेत मिळाले आहेत.
तसेच इथेनॉल कोटा वाढवणे, साखरेच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ, व्याज सवलतीचे पैसे तातडीने देणे आणि साखर कारखान्यांच्या कर्ज पुनर्गठनाबाबत केंद्र सरकार लवकरच अनुकूल निर्णय घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
आंबा आणि हापूस आंबा उत्पादकांच्या विमा प्रश्नांबाबतही केंद्र सरकार सकारात्मक असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here