कुंभवे शाळेत विठुनामाचा गजर

0
15
कुंभवे शाळेत विठुनामाचा गजर
कुंभवे शाळेत विठुनामाचा गजर

कुंभवे शाळेत विठुनामाचा गजर

दापोली-
दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद जीवन शिक्षण आदर्श शाळा कुंभवे येथे आषाढी एकादशीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी भजन, दिंडीच्या सादरीकरणातून विठुनामाचा गजर केला. शाळेत विठ्ठल-रखुमाईच्या छोट्या मूर्तीची स्थापना करून पूजा करण्यात आली. त्यानंतर आरती, भजन तथा दिंडीच्या माध्यमातून विठुनामाच्या गजराने शाळेतील वातावरणात उत्साहवर्धक व भक्तिमय झाले होते.
यावेळी विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी रिंगण करुन फुगडीचे सादरीकरण केले. आषाढी एकादशीच्या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन मुख्याध्यापिका ज्योती पवार यांच्या मार्गदर्शाखाली शिक्षक सुनंदा मळगे, पूनम चौधरी, कोमल मुरुडकर, बाबू घाडीगांवकर यांनी केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here