कुटगिरीतील लोखंडी साकव दुर्घटनेत बैलाचा मृत्यू; शेतकऱ्याला १८ तासांत ३२ हजारांची शासकीय मदत

0
12

गुहागर, प्रतिनिधी :

मौजे कुटगिरी येथील भैरी शंकर मंदिरानजीक तिजग नदीवरील लोखंडी साकव सोमवारी सायंकाळी अचानक कोसळल्याने आठ जनावरे त्यामध्ये अडकली होती. स्थानिक ग्रामस्थांच्या तत्पर मदतीमुळे सर्व जनावरांना बाहेर काढण्यात यश आले. मात्र या दुर्घटनेत एका बैलाचा मृत्यू झाला असून उर्वरित जनावरे किरकोळ जखमी झाली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी दिलीप नारायण लिंगायत यांच्या मालकीचा बैल या दुर्घटनेत मृत झाला. घटनेची माहिती मिळताच पशुवैद्यकीय विभागाने घटनास्थळी धाव घेत जखमी जनावरांवर तातडीने उपचार सुरू केले तसेच मृत बैलाचे शवविच्छेदनही पूर्ण करण्यात आले.
दुर्घटनेनंतर प्रशासनाने त्वरित कार्यवाही करत नुकसानग्रस्त शेतकरी दिलीप लिंगायत यांना ३२ हजार रुपयांच्या शासकीय आर्थिक सहाय्याचा धनादेश अवघ्या १८ तासांच्या आत सुपूर्द केला. आज सकाळी ११.३० वाजता उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार परिक्षीत पाटील, मंडळ अधिकारी अनिल राठोड आणि ग्राम महसूल अधिकारी यांच्या उपस्थितीत हा धनादेश देण्यात आला.
यावेळी प्रांताधिकाऱ्यांनी जखमी जनावरांवर आवश्यक उपचार सुरू ठेवण्याच्या सूचना पशुवैद्यकीय विभागाला दिल्या. प्रशासनाने दाखविलेल्या तत्परतेमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तात्काळ दिलासा मिळाला असून ग्रामस्थांनी प्रशासनाच्या कार्याचे कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here