कुडाळदेशकर प्रीमियर लीगच्या दशकपूर्तीनिमित्त ‘केपीएल अश्वमेध २०२५’ गौरव ग्रंथाचे प्रकाशन
कुडाळ :
कुडाळदेशकर प्रीमियर लीगच्या (KPL) २०१६ ते २०२५ या दशकभरातील क्रिकेट स्पर्धांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या ‘केपीएलचा अश्वमेध २०२५’ या गौरव ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले आहे. कुडाळदेशकर प्रीमियर लीगच्या दहा वर्षांच्या प्रवासाचा आढावा या प्रकाशनातून मांडण्यात आला आहे.



