उद्योगमंत्री उदय सामंत यांची झडपोलीतील जिजाऊ संस्थेला भेट; विविध उपक्रमांची घेतली माहिती

0
12

विक्रमगड :
राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील झडपोली येथे असलेल्या जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या मुख्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक, सामाजिक आणि आरोग्यविषयक उपक्रमांची माहिती घेतली.

या भेटीदरम्यान त्यांनी संस्थेचे श्री. भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालय, सौ. भावनादेवी भगवान सांबरे सीबीएसई शाळा, स्पर्धा परीक्षांसाठी चालविण्यात येणारे मोफत अभ्यासवर्ग तसेच पोलीस आणि सैन्य भरतीपूर्व मोफत प्रशिक्षण केंद्राची पाहणी करून या उपक्रमांची माहिती जाणून घेतली.
संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष निलेश सांबरे यांनी केलेल्या आदरातिथ्याबद्दल उदय सामंत यांनी त्यांचे आभार मानले. तसेच जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here