केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA आणि पेन्शनधारकांच्या DR मध्ये ३ टक्के वाढ; १ जुलैपासून लागू

0
9

नवी दिल्ली :
केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेत महागाई भत्ता (DA) आणि महागाई सवलत (DR) यामध्ये ३ टक्के वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयानुसार, महागाई भत्ता आणि महागाई सवलतीचा दर मूळ वेतन व मूळ निवृत्तीवेतनाच्या ६० टक्क्यांवरून ६३ टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. ही वाढ १ जुलै २०२६ पासून लागू होणार आहे.
या निर्णयाचा लाभ सुमारे ४८ लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि ६८ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार आहे. वाढीव महागाई भत्ता आणि महागाई सवलतीमुळे कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात, तसेच निवृत्तीवेतनधारकांच्या पेन्शनमध्ये वाढ होणार आहे. वाढ १ जुलैपासून लागू होणार असल्याने पात्र लाभार्थ्यांना नियमानुसार थकबाकीही मिळू शकते.
या निर्णयामुळे केंद्र सरकारच्या तिजोरीवर दरवर्षी अंदाजे १०,०१६ कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांचे वेतन आणि निवृत्तीवेतनधारकांच्या उत्पन्नात महागाईनुसार समायोजन करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here