UGC-NET डिसेंबर २०२६ अर्जाची मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली; विलंब शुल्क नाही
UGC-NET डिसेंबर २०२६ अर्जाची मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली; विलंब शुल्क नाही
नवी दिल्ली :
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेसाठी (UGC-NET) डिसेंबर २०२६ सत्रातील अर्ज भरण्याची मुदत ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे अद्याप अर्ज प्रक्रिया पूर्ण न केलेल्या उमेदवारांना अर्ज सादर करण्याची आणखी एक संधी मिळाली आहे.
आतापर्यंत ८.७८ लाखांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली असून, ६.९२ लाखांहून अधिक उमेदवारांनी शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. उमेदवारांना ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ११.५० वाजेपर्यंत अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. या मुदतवाढीसाठी कोणतेही विलंब शुल्क आकारले जाणार नाही.
ज्या उमेदवारांनी अद्याप अर्ज पूर्ण केलेला नाही, त्यांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्जातील आवश्यक माहिती भरावी, परीक्षा शुल्क जमा करावे आणि अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कन्फर्मेशन पेज डाउनलोड करून ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
UGC-NET परीक्षेसंदर्भातील अधिकृत माहिती आणि अर्ज प्रक्रियेसाठी उमेदवारांनी ugcnet.nta.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.