केईएम रुग्णालयात अत्याधुनिक ३ टेस्ला एमआरआय सुविधेचे लोकार्पण; रितू तावडे यांच्या हस्ते उद्घाटन

0
9
केईएम रुग्णालयात अत्याधुनिक ३ टेस्ला एमआरआय सुविधेचे लोकार्पण; रितू तावडे यांच्या हस्ते उद्घाटन
केईएम रुग्णालयात अत्याधुनिक ३ टेस्ला एमआरआय सुविधेचे लोकार्पण; रितू तावडे यांच्या हस्ते उद्घाटन

केईएम रुग्णालयात अत्याधुनिक ३ टेस्ला एमआरआय सुविधेचे लोकार्पण; रितू तावडे यांच्या हस्ते उद्घाटन

मेंदू, मज्जासंस्था, मणका आणि सांध्यांच्या आजारांचे अचूक निदान शक्य; सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात प्रगत आरोग्यसेवा उपलब्ध होणार

मुंबई :
परळ येथील प्रसिद्ध केईएम रुग्णालयात अत्याधुनिक ३ टेस्ला एमआरआय (MRI) वैद्यकीय तपासणी सुविधेचे लोकार्पण मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. ही आधुनिक सुविधा जनतेच्या सेवेत समर्पित करताना आनंद होत असल्याची भावना महापौर रितू तावडे यांनी व्यक्त केली.

सन १९२६ पासून वैद्यकीय शिक्षण आणि रुग्णसेवेची गौरवशाली परंपरा जपणाऱ्या केईएम रुग्णालयाच्या वैद्यकीय सुविधांमध्ये या नव्या तंत्रज्ञानामुळे महत्त्वाची भर पडली आहे. अत्याधुनिक ३ टेस्ला एमआरआय यंत्रणेमुळे मेंदू, मज्जासंस्था, मणका तसेच सांध्यांशी संबंधित विविध आजारांचे अधिक स्पष्ट आणि अचूक निदान करणे शक्य होणार आहे.
सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय रुग्णांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हा या सुविधेमागील मुख्य उद्देश आहे. आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही रुग्णाला आवश्यक वैद्यकीय तपासणी किंवा उपचारांपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी महापालिका सातत्याने प्रयत्नशील आहे. याशिवाय सीटी स्कॅन आणि डीएसए यांसारख्या आधुनिक वैद्यकीय तपासणी सुविधांनाही अधिक बळ देण्याचा प्रयत्न असल्याचे महापौरांनी सांगितले.
या लोकार्पण सोहळ्याला बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्ष हरीश भांदिर्गे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
या महत्त्वपूर्ण सुविधेच्या उभारणीसाठी योगदान देणारे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हरीश पाठक, रेडिओलॉजी विभाग, वैद्यकीय पथक आणि महानगरपालिका प्रशासनाचे महापौर रितू तावडे यांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here