नेरुळमध्ये दोन दिवसीय जिल्हा साहित्य संमेलन; वनमंत्री गणेश नाईक यांची उपस्थिती

0
7
नेरुळमध्ये दोन दिवसीय जिल्हा साहित्य संमेलन; वनमंत्री गणेश नाईक यांची उपस्थिती
नेरुळमध्ये दोन दिवसीय जिल्हा साहित्य संमेलन; वनमंत्री गणेश नाईक यांची उपस्थिती

नेरुळमध्ये दोन दिवसीय जिल्हा साहित्य संमेलन; वनमंत्री गणेश नाईक यांची उपस्थिती

ग्रंथदिंडी, परिसंवाद आणि कविसंमेलनातून मराठी साहित्याचा जागर; वाचनसंस्कृती जपण्याचे गणेश नाईक यांचे आवाहन

नेरुळ :
मराठी साहित्याची समृद्ध परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपण्याच्या उद्देशाने नेरुळ येथील तेरणा ऑडिटोरियममध्ये कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालय संस्थेच्या वतीने दोन दिवसीय जिल्हा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाला राज्याचे वनमंत्री गणेश नाईक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

साहित्य संमेलनाच्या माध्यमातून साहित्यिक, कवी, लेखक आणि वाचकांना एकत्र येण्याची संधी मिळते. अशा संमेलनांमुळे साहित्य क्षेत्रातील विचारांची देवाणघेवाण होण्याबरोबरच नव्या साहित्यिकांना आपले विचार आणि साहित्य मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होते, असे गणेश नाईक यांनी सांगितले.
या संमेलनात आयोजित ग्रंथदिंडी, परिसंवाद, कविसंमेलन तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठी साहित्याची समृद्ध परंपरा आणि सांस्कृतिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
आजच्या डिजिटल युगात वाचनसंस्कृती टिकवणे, नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन देणे आणि साहित्य क्षेत्रातील सकारात्मक विचारांची देवाणघेवाण घडवून आणणे ही काळाची गरज आहे. अशा साहित्यिक उपक्रमांमुळे समाजातील वैचारिक समृद्धी आणि सांस्कृतिक जाणीव अधिक दृढ होण्यास मदत होते, असेही ते म्हणाले.
या दोन दिवसीय साहित्य संमेलनाचे आयोजन केल्याबद्दल कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालय संस्थेचे पदाधिकारी, आयोजक आणि सर्व साहित्यप्रेमींचे गणेश नाईक यांनी अभिनंदन केले. तसेच संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here