कोकणात आलेले अनेक पर्यटक मुक्काम अर्धवट सोडून परतीच्या प्रवासा
कोकणात आलेले अनेक पर्यटक मुक्काम अर्धवट सोडून परतीच्या प्रवासाला
देवगड l प्रतिनिधी
आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थिती, संभाव्य इंधन टंचाई आणि सोशल मीडियावर सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या चर्चांमुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे उन्हाळी पर्यटनासाठी कोकणात आलेले अनेक पर्यटक मुक्काम अर्धवट सोडून परतीच्या प्रवासाला लागले आहेत.
गॅस उपलब्धतेच्या समस्येमुळे काही हॉटेल तात्पुरते बंद ठेवले असून काही ठिकाणी पुन्हा चुलीवर स्वयंपाक सुरू करण्यात आला आहे. पेट्रोल, डिझेल आणि CNG संदर्भातील अनिश्चिततेमुळे पेट्रोल पंपांवर लांब रांगा लागल्या असून पर्यटकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.