भोम पुनर्वसन येथे बुद्धविहार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे लोकार्पण उत्साहात

0
48

News :
Bhom पुनर्वसन येथे उभारण्यात आलेल्या बुद्धविहार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या नूतन वास्तूचे भव्य लोकार्पण उत्साहात पार पडले. यानिमित्ताने भोम बौद्ध विकास मंडळ मुंबई व ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमावेळी उपस्थित मान्यवरांनी नव्याने उभारण्यात आलेले सुसज्ज बुद्धविहार हे जनतेसाठी आणि विशेषतः युवकांसाठी प्रेरणास्थान ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच भविष्यातील विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री म्हणून आपण सक्षम असल्याचे आश्वासनही देण्यात आले.

कार्यक्रमाला वैभववाडी भाजपा मंडळ अध्यक्ष सुधीर नकाशे, सभापती सिद्धेश रावराणे, जि. प. सदस्य प्रमोद रावराणे, भालचंद्र साठे, नासीर काझी, साची कोलते, प्रकाश पाटणकर, दिलीप तळेकर, बंड्या मांजरेकर, प्राची तावडे, डॉ. जगन्नाथ जामदार, शारदा कांबळे, सुवर्णा संसारे, राजेंद्र राणे, विजय तावडे, महेश संसारे, अध्यक्ष यशवंत कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here