वंदे भारत, तेजससह तीन गाड्यांचे आरक्षण ४ जूनपासून सुरू
रत्नागिरी — कोकण रेल्वे मार्गावर १५ जून २०२६ पासून मान्सून वेळापत्रक लागू होत असून त्याअनुषंगाने काही गाड्यांच्या सुधारित वेळापत्रकानुसार आरक्षण प्रक्रिया ४ जून २०२६ पासून सुरू करण्यात येणार आहे.
कोकण रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार खालील तीन गाड्यांसाठी ४ जूनपासून आरक्षण उपलब्ध होणार आहे.
१) ट्रेन क्र. २२२२९ / २२२३०
मुंबई सीएसएमटी – मडगाव जंक्शन – मुंबई सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस
२) ट्रेन क्र. २२११९ / २२१२०
मुंबई सीएसएमटी – मडगाव जंक्शन – मुंबई सीएसएमटी तेजस एक्सप्रेस
३) ट्रेन क्र. ११०९९ / १११००
लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव जंक्शन – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
प्रवाशांना या गाड्यांसाठी ४ जून २०२६ पासून पीआरएस (PRS) पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावरील सुरक्षितता लक्षात घेऊन दरवर्षी मान्सून वेळापत्रक लागू केले जाते. त्यानुसार काही गाड्यांच्या वेळांमध्ये बदल होण्याची शक्यता असल्याने प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन सुधारित वेळापत्रकानुसार करावे, असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे.