देवगड–निपाणी (६२ कि.मी.) आणि विजयदुर्ग–कासार्डे (५० कि.मी.) मार्गांवरील वृक्षारोपणाच्या कामांचा मंत्रालयातील दालनात आढावा

0
42

रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपण करताना परिसर अधिक आकर्षक, नयनरम्य आणि पर्यटनाला पूरक दिसावा यासाठी रंगीबेरंगी फुलझाडांची लागवड करण्यावर भर द्यावा, यासाठी गुलमोहर, कांचन, ताम्हण, आकाश शेवगा, जांभूळ, साग, शिसम आणि एशियन चेरी यांसारख्या झाडांची लागवड करावी, अशा सूचना संबंधितांना सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या.

वृक्षारोपण केलेली झाडे दीर्घकाळ टिकून राहावीत यासाठी प्रभावी नियोजन, स्थानिक हवामान व भौगोलिक परिस्थितीला अनुरूप प्रजातींची निवड तसेच झाडांच्या संगोपनासाठी दीर्घकालीन व्यवस्थापन आराखडा तयार करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश संबंधितांना दिले.
सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असल्याने रस्त्यांच्या दुतर्फा हरित पट्टा निर्माण करून परिसराचे सौंदर्य वाढविणे, पर्यावरण संवर्धनाला चालना देणे आणि प्रवास अधिक सुरक्षित व सुखकर करणे या उद्देशाने जिल्ह्यातील इतर प्रमुख मार्गांवरही अशाच प्रकारचे वृक्षारोपण व सुशोभीकरण करण्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
बैठकीस सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे, सिंधुदुर्ग विभागीय वन अधिकारी, दिनेश बागुल सार्वजनिक बांधकाम विभाग सिंधुदुर्गचे अधीक्षक अभियंता यासह संबंधित अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (VC) द्वारे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here