कोकण रेल्वे वापरकर्ते सल्लागार समितीची बैठक; प्रवासी सुविधांवर चर्चा

0
8

केआरसीएलच्या वापरकर्त्यांशी संबंधित विविध समस्या, प्रवासी सुविधा आणि सेवा सुधारणा याबाबत चर्चा करण्यासाठी कोकण रेल्वे वापरकर्ते सल्लागार समितीची (KRUCC) बैठक २४ ऑगस्ट २०२६ रोजी पार पडली.
या बैठकीत कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे (KRCL) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी कोकण रेल्वे मार्गावरील प्रमुख उपक्रम व सद्यस्थितीबाबत माहिती दिली. तसेच रेल्वे वापरकर्त्यांकडून मांडण्यात येणाऱ्या विविध समस्या, त्यांचे निराकरण आणि प्रवाशांना अधिक चांगल्या सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
प्रवाशांच्या सूचना व अपेक्षा लक्षात घेऊन सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांवरही बैठकीत विचारविनिमय करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here