नवी मुंबईत ‘खेळ खेळूया मंगळागौरीचा’ उत्साहात; १५ महिला संघांचा सहभाग

0
12
नवी मुंबईत ‘खेळ खेळूया मंगळागौरीचा’ उत्साहात; १५ महिला संघांचा सहभाग
नवी मुंबईत ‘खेळ खेळूया मंगळागौरीचा’ उत्साहात; १५ महिला संघांचा सहभाग

नवी मुंबईत ‘खेळ खेळूया मंगळागौरीचा’ उत्साहात; १५ महिला संघांचा सहभाग

झिम्मा, फुगडी, पिंगा, काचगुण्या अन् उखाण्यांनी रंगला पारंपरिक सोहळा; विजेत्या संघांना रोख पारितोषिके

नवी मुंबई :
बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या संकल्पनेतून, गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्थेच्या माध्यमातून आणि भाजप नेते निलेश म्हात्रे यांच्या पुढाकारातून वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात ‘खेळ खेळूया मंगळागौरीचा’ हा पारंपरिक सोहळा उत्साहात पार पडला.

 

नवी मुंबईतील महिलांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातील १५ महिला संघांनी प्रत्यक्ष सहभाग घेत झिम्मा, फुगडी, पिंगा, काचगुण्या, उखाणे तसेच मंगळागौरीच्या विविध पारंपरिक खेळांचे बहारदार सादरीकरण केले.
कार्यक्रमाला आमदार मंदाताई म्हात्रे, भाजप नेते निलेश म्हात्रे यांच्यासह अपर्णा शहा, उषा दत्त, माजी नगरसेवक राजू शिंदे, माजी नगरसेविका माधवी शिंदे, पनवेल महापालिका महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ममता प्रीतम म्हात्रे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, महिला, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धेतील उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या संघांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रथम क्रमांक ₹५,००१, द्वितीय क्रमांक ₹३,००१, तृतीय क्रमांक ₹२,००१, तर उत्तेजनार्थ ₹१,००१ अशी रोख पारितोषिके देण्यात आली.
याशिवाय सहभागी आणि उपस्थित सर्व महिला भगिनींना पारंपरिक पैठणी आणि नथ ही विशेष बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
पारंपरिक मंगळागौरीच्या खेळांना आधुनिक शहरी वातावरणात व्यासपीठ मिळाल्याने महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या उपक्रमातून मराठी संस्कृती आणि पारंपरिक लोककला जतन करण्यासोबतच महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन मिळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here