मुख्यमंत्री सहाय्यता निधी–टाटा ट्रस्टच्या करारातून रुग्णांना दिलासा

0
8
मुख्यमंत्री सहाय्यता निधी–टाटा ट्रस्टच्या करारातून रुग्णांना दिलासा
मुख्यमंत्री सहाय्यता निधी–टाटा ट्रस्टच्या करारातून रुग्णांना दिलासा

मुख्यमंत्री सहाय्यता निधी–टाटा ट्रस्टच्या करारातून रुग्णांना दिलासा

यकृत प्रत्यारोपण, कर्करोग व मेंदूवरील शस्त्रक्रियांसाठी सहा महिन्यांत ९ रुग्णांना ₹८९.६० लाखांची मदत

मुंबई :
महागड्या वैद्यकीय उपचारांचा खर्च परवडत नसलेल्या गरजू रुग्णांना आर्थिक आधार मिळावा, यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्ट यांच्यातील सामंजस्य करारातून मदतीचा नवा मार्ग उपलब्ध झाला आहे. या करारांतर्गत अवघ्या सहा महिन्यांत ९ रुग्णांना एकूण ₹८९.६० लाखांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे.
१२ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या सामंजस्य करारानुसार राज्यातील १५० गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यकृत प्रत्यारोपण, कर्करोगावरील उपचार तसेच मेंदूवरील शस्त्रक्रियांसारख्या खर्चिक उपचारांसाठी या माध्यमातून मदत उपलब्ध करून दिली जात आहे.
पैशांअभावी कोणत्याही रुग्णाचा उपचार थांबू नये’ या उद्देशाने शासनाने हा संवेदनशील पुढाकार घेतला आहे. आर्थिक अडचणींमुळे गंभीर आजारांवरील उपचार घेण्यात अडथळे येणाऱ्या रुग्णांना या योजनेचा आधार मिळणार आहे.
या उपक्रमामुळे महागड्या उपचारांची गरज असलेल्या गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
मदतीसाठी टोल फ्री क्रमांक : १८०० १२३ २२११

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here