दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या फटाक्यांच्या ध्वनी तीव्रतेची चाचणी सायबर कॉलेज, कोल्हापूर येथील मैदानावर घेण्यात आली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने ही चाचणी करण्यात आली.
या चाचणीदरम्यान सुटे फटाके, फटाक्यांच्या माळा तसेच विविध प्रकारच्या फटाक्यांच्या आवाजाची तीव्रता मोजण्यात आली. शासनाने निर्धारित केलेल्या ध्वनी मर्यादेत असलेल्या फटाक्यांनाच दिवाळी सणादरम्यान बाजारात विक्रीसाठी परवानगी देण्यात येणार आहे.
शासनाच्या नियमांनुसार निर्धारित ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. असे फटाके बाजारात विक्री करताना आढळल्यास संबंधित विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
नागरिकांनी पर्यावरणपूरक आणि कमी आवाजाच्या फटाक्यांचा वापर करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या चाचणीवेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी निखिल घरत, उपप्रादेशिक अधिकारी प्रमोद माने, क्षेत्र अधिकारी अंकुश पाटील, रोहिदास मातकर, कोल्हापूर महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाचे केवल लोट, सायबर कॉलेज पर्यावरण विभागाचे अभियंता डी. एस. माळी, डॉ. पूजा पाटील, निसर्गमित्र अनिल चौगुले तसेच अन्य सदस्य उपस्थित होत