कोल्हापुरात महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणाचे स्वतंत्र खंडपीठ सुरू करण्याची मागणी

0
10

महसुली प्रकरणांच्या जलद निपटाऱ्यासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

कोल्हापूर :
महसुली प्रकरणांचा जलदगतीने निपटारा होऊन नागरिकांना सुलभ आणि त्यांच्या जवळ न्याय मिळावा, यासाठी कोल्हापूर येथे महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणाचे (MRT) स्वतंत्र खंडपीठ स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे. आरोग्यमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी केली.
कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांतील महसूलविषयक अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. या प्रकरणांसाठी नागरिकांना दूरवर प्रवास करावा लागत असल्याने त्यांचा वेळ, पैसा आणि श्रम खर्ची पडतात, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कार्यरत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्याच धर्तीवर महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणाचे स्वतंत्र खंडपीठ सुरू केल्यास पश्चिम महाराष्ट्रासह कोकणातील नागरिकांना न्याय मिळवणे अधिक सुलभ होईल, असे आबिटकर यांनी म्हटले आहे.
कोल्हापुरात एमआरटीचे स्वतंत्र खंडपीठ सुरू करण्यास प्राधान्याने मान्यता मिळावी, यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here