आरोग्यविषयक प्रश्नांवर चर्चा; सकारात्मक तोडग्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय
मुंबई :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेबाबत मंत्रालयात आढावा बैठक घेण्यात आली. महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे उपस्थित होते.
बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्यविषयक विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील आरोग्य सुविधांशी संबंधित प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती आमदार निलेश राणे यांनी दिली.
यावेळी माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेशी संबंधित विविध बाबींचा यावेळी आढावा घेण्यात आला.