आशिये-कणकवली बस डेपोकडे जाणारा रस्ताही विकसित करण्याचा आढावा
कणकवली :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली बस स्टँडचा PPP (पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप) मॉडेलवर विकास करण्यासह आशिये गावातून कणकवली बस डेपोकडे जाणारा रस्ता विकसित करण्याबाबत आढावा बैठक घेण्यात आली.
सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या दालनात झालेल्या या बैठकीत दोन्ही कामांच्या अनुषंगाने आवश्यक बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांना पुढील कार्यवाहीबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या.
कणकवली शहरातील वाहतूक व्यवस्था, प्रवासी सुविधा आणि पायाभूत सुविधांचा विकास अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने ही कामे नियोजनबद्ध पद्धतीने पुढे नेण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.